चांगला भविष्यकाळ शिक्षणातच दडलेला - महापौर
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-विद्यार्थ्यांना बालपनातच योग्य मार्गदर्शन लाभले. तर भविष्यात ते विद्यार्थी ऊंच शिखर गाठू शकतात. चांगला भविष्यकाळ हा शिक्षणातच दडला आहे, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडमधील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अ प्रभाग अध्यक्षा, अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा, करुणा चिंचवडे, नगरसेवक सुनिता तापकीर, शर्मिला बाबर, निर्मला कुटे, आरती चोंधे, आश्विनी चिंचवडे, आश्विनी जाधव, मिनल यादव, नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्य्क आयुक्त स्मिता झगडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सुहास बहादरपुरे आदी उपस्थित होते.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, लोककल्याणाच्या योजनांचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकरचे गुण संपादन केले. म्हणजे सर्व काही झाले असे नाही. तर प्रत्येकाने माणूस म्हणून, माणूसकी जोपासून जनमानसात काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा. परंतू समाज कारणाबरोबरच राजकारणातही त्यांनी
४ हजार ९२३ विद्यार्थ्यांना बक्षिसे
इयत्ता १० वीतील ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या १३४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, ८० ते ९० टक्के पर्यंत गुण प्राप्त केलेल्या २६४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी ६४ लाख १० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले. इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या ९४२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १ कोटी ४१ लाख ३० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले. एकूण ४९२३ लाभार्थी विद्यार्थ्यांना एकूण रक्कम रुपये ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली.